महाराष्ट्र शासन | जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर
जमीन भोगवटादार वर्ग-२ चे वर्ग-१ मध्ये रूपांतरण संगणकीय प्रणाली
Land Tenure Conversion Workflow Portal (Class-II to Class-I) | District Administration, Kolhapur
भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ मध्ये रूपांतरण सुलभ, पारदर्शक व गतिमान
महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, १९६१ च्या कलम २७ अन्वये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकरी व नागरिकांसाठी पूर्णतः ऑनलाईन, पारदर्शक आणि डिजिटल स्वाक्षरीत रूपांतरण सेवा.
Kolhapur Land Tenure Conversion
Portal Login & Registration
जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यातील पारदर्शक, लोकाभिमुख व गतिमान महसूल प्रशासन
जिल्हा महसूल प्रशासन
District Collectorateकोल्हापूर जिल्हा महसूल प्रशासनाचे सर्वोच्च कार्यालय. भोगवटादार वर्ग-२ जमिनींचे वर्ग-१ मध्ये रूपांतरण, छाननी, मंजुरी व अंतिम आदेश निर्गमित करण्याचे अधिकार क्षेत्र.
📍 पत्ता: स्वराज्य भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, महावीर उद्यान समोर, नागाळा पार्क, कोल्हापूर - ४१६००३
🏛️ महसूल प्राधिकरण: मा. जिल्हाधिकारी / मा. अपर जिल्हाधिकारी
✉️ ई-मेल: collector.kolhapur@maharashtra.gov.in
📞 दूरध्वनी: ०२३१-२६५४८११ / ०२३१-२६५७८५५
जिल्हा कार्यक्षेत्र (१२ तालुके)
Revenue Jurisdictionया प्रणालीद्वारे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व १२ तालुक्यांमधील भोगवटादार वर्ग-२ जमिनींचे वर्ग-१ मध्ये रूपांतरण करण्याचे अर्ज हाताळले जातात:
कार्यालयीन वेळ व नागरिक मदत
Working Hours & Supportनागरिकांच्या सुविधेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष मार्गदर्शन कक्ष कार्यरत आहे.
🕒 कार्यालयीन कामकाजाची वेळ: सोमवार ते शुक्रवार (सकाळी ९:४५ ते सायं. ६:१५)
👥 नागरिक भेट वेळ: दुपारी ३:०० ते सायंकाळी ५:००
🌐 तक्रार निवारण पोर्टल: maharashtra.gov.in
📞 पोर्टल हेल्पलाइन: १८००-१२०-८०४०
योजनेविषयी व कायदेशीर तरतुदी
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ व शासन निर्णयानुसार वर्ग-२ चे वर्ग-१ रूपांतरण
📜 भोगवटादार वर्ग-२ चे वर्ग-१ मध्ये रूपांतरण म्हणजे काय?
भोगवटादार वर्ग-२ जमिनी या नियंत्रित सत्तेच्या (Occupant Class-II) असतात, ज्यांच्या विक्री किंवा हस्तांतरणासाठी महसूल अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीची व नजराणा भरण्याची आवश्यकता असते. महाराष्ट्र शासनाच्या प्रचलित शासन निर्णयान्वये विहित नजराणा भरणा करून अशा जमिनींचे रूपांतरण भोगवटादार वर्ग-१ (Occupant Class-I - संपूर्ण मालकी हक्क) मध्ये करण्याची ही सुलभ ऑनलाईन सोय आहे.
📑 आवश्यक कागदपत्रांची यादी (Mandatory Documents)
- जमिनीचा चालू ३ महिन्यांतील ७/१२ आणि ८-अ उतारा.
- मूळ जमीन वाटप/प्रदान केल्याचा आदेश (कलम २७ अन्वये).
- मुळ जमीन वाटप आदेश / कब्जेपट्टी आधारे मूळ खातेदार यांचे नाव गाव दप्तरी नोंद केलेला फेरफार व नाव दाखल केलेला जुना ७/१२ उतारा.
- विषयांकीत जमिनीचे हस्तांतरण (खरेदी/वारस,इ) झाले असलेल त्याबाबत नोंद घेतलेला फेरफार व नाव दाखल केलेला जुना ७/१२ उतारा.
- अटींचे उल्लंघन झाले असल्यास, सक्षम प्राधिकान्याने ते नियमाधीन केल्याचा आदेश.
- जिल्हाधिकान्यांच्या पूर्वपरवानगीने हस्तांतरण किंवा वापर बदल केला असल्यास, त्या परवानगी आदेशाची प्रत.
- अर्जदाराचे आधार कार्ड / ओळखपत्र.
- अर्जदार यांचे विहीत नमुन्यातील बंधपत्र (स्टॅम्प पेपरची आवश्यकता नाही).
पारदर्शक ६-टप्पे कार्यपद्धती
अर्जापासून ते अंतिम डिजिटल स्वाक्षरी आदेश व सनद निर्गमित होईपर्यंतचा संपूर्ण पारदर्शक प्रवास
१. ऑनलाईन अर्ज व कागदपत्रे
नागरिकाने पोर्टलवर नोंदणी करून जमिनीचा ७/१२, वाटप आदेश व इतर कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज सादर करणे.
👤 नागरिक / अर्जदार स्तर२. स्थळ पाहणी व पंचनामा
संबंधित मंडळ अधिकारी प्रत्यक्ष जागेची पाहणी करून शर्तभंग, कब्जा व वस्तुस्थितीदर्शक पंचनामा व अहवाल सादर करतात.
🌾 मंडळ अधिकारी व तलाठी स्तर३. तहसीलदार छाननी व मूल्यांकन
तहसीलदार कार्यालयाकडून अहवालाची सखोल छाननी, रेडीरेकनर दरानुसार नजराणा रक्कम मूल्यांकन व शिफारस केली जाते.
⚖️ तहसीलदार कार्यालय४. जिल्हा प्रशासन पुनरावलोकन
जिल्हाधिकारी कार्यालयात छाननी व नियमानुसार वर्ग-१ रूपांतरणासाठी प्राथमिक मंजुरी व चलन निर्मिती केली जाते.
🏛️ जिल्हाधिकारी कार्यालय५. नजराणा चलन भरणा
अर्जदाराने शासकीय GRAS प्रणालीद्वारे विहित नजराणा व मूल्य भरून चलन पोर्टलवर अपलोड करणे व पडताळणी होणे.
💳 चलन भरणा व पडताळणी६. अंतिम डिजिटल स्वाक्षरी आदेश
अपर जिल्हाधिकारी यांच्या अधिकृत डिजिटल स्वाक्षरीने (DSC) अंतिम रूपांतरण आदेश व सनद निर्गमित होते.
🔏 अपर जिल्हाधिकारी (DSC)पोर्टल अर्जांची सांख्यिकी
कोल्हापूर जिल्ह्यातील प्राप्त अर्ज, प्रगतीपथावरील प्रकरणे व निर्गमित आदेशांची पारदर्शक आकडेवारी
Control Dashboard
Overview of all active applications
📊 Workflow Stages (Click to filter applications)
| ID | Applicant | Village/Taluka | Circle | Status | Action |
|---|
New Conversion Application
Application Details (अर्ज तपशील)
भोगवटादार वर्ग -२ जमिनीचे भोगवटादार वर्ग -१ मध्ये रूपांतरण करणेबाबतचा अर्ज
जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर.
विषय: महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, १९६१ च्या कलम २७ अन्वये मिळालेल्या भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे भोगवटादार वर्ग-१ मध्ये रुपांतर करून मिळणेबाबत.
संदर्भ: महाराष्ट्र शासन राजपत्र अधिसूचना क्रमांक: मशेम-२०२०/प्र. क्र. ५०/ल-७, दिनांक ४ मे, २०२६.
महोदय,
मी, अर्जदार , या अर्जाद्वारे विनंती करतो/करते की, मला महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, १९६१ च्या कलम २७ अंतर्गत भोगवटादार वर्ग-२ धारणाधिकारावर जमीन प्राप्त झाली आहे. सदर जमीन प्रदान केल्याच्या दिनांकापासून १० वर्षे उलटून गेली आहेत. मी या जमिनीचे रुपांतर भोगवटादार वर्ग-१ मध्ये करण्यासाठी खालील तपशील सादर करीत आहे:
१. अर्जदाराचा व जमिनीचा तपशील:
| अर्जदाराचे पूर्ण नाव | : |
| पत्ता व मोबाईल क्रमांक | : |
| जमिनीचा पत्ता / स्थान | : गाव: , तालुका: |
| गट क्रमांक / सर्व्हे क्रमांक | : |
| जमिनीचे एकूण क्षेत्रफळ | : हे. आर. |
| जमीन वाटप / प्रदान केल्याचा दिनांक | : |
| जमिनीची आकारणी रु. (Assessment Tax) | : |
२. जमिनीची सद्यस्थिती व वापर (योग्य पर्याय निवडा/टिक करा):
- अ) जमिनीचे क्षेत्र:
- [ ] महानगर प्रदेश, महानगरपालिका, किंवा नगर परिषद व त्यांची सीमावर्ती क्षेत्रे.
- [ ] वरील क्षेत्रांव्यतिरिक्त इतर (ग्रामीण) क्षेत्र.
- ब) वाटपानंतर जमिनीचा वापर व हस्तांतरण:
- [ ] जमिनीचे हस्तांतरण किंवा वापरात बदल झालेला नाही.
- [ ] जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीने जमीन हस्तांतरित केली आहे.
- [ ] वापरात बदल केला आहे.
- क) जमिनीचा सध्याचा वापर: [ ] शेतीसाठी / [ ] औद्योगिक किंवा इतर बिगरशेती प्रयोजनासाठी.
३. अर्जदाराचे हमीपत्र:
मी अशी हमी देतो/देते की, पडताळणीनंतर नियमानुसार आकारण्यात येणारे रूपांतरण अधिमूल्य (Conversion Premium), नोटीस मिळाल्यापासून ३ महिन्यांच्या आत भरण्यास मी बांधील राहीन.
यास्तव, विनंती आहे की माझ्या उपरोक्त जमिनीचे भोगवटादार वर्ग-२ मधून भोगवटादार वर्ग-१ मध्ये रूपांतरण करून मिळण्याचा अंतिम आदेश पारित करावा, ही नम्र विनंती.
आपला/आपली नम्र,
(अर्जदाराची स्वाक्षरी)
नाव:
सोबत जोडायची आवश्यक कागदपत्रे (चेकलिस्ट):
- जमिनीचा चालू ३ महिन्यांतील ७/१२ आणि ८-अ उतारा.
- मूळ जमीन वाटप/प्रदान केल्याचा आदेश (कलम २७ अन्वये).
- मुळ जमीन वाटप आदेश / कब्जेपट्टी आधारे मूळ खातेदार यांचे नाव गाव दप्तरी नोंद केलेला फेरफार व नाव दाखल केलेला जुना ७/१२ उतारा.
- विषयांकीत जमिनीचे हस्तांतरण (खरेदी/वारस,इ) झाले असलेल त्याबाबत नोंद घेतलेला फेरफार व नाव दाखल केलेला जुना ७/१२ उतारा.
- अटींचे उल्लंघन झाले असल्यास, सक्षम प्राधिकान्याने ते नियमाधीन केल्याचा आदेश.
- जिल्हाधिकान्यांच्या पूर्वपरवानगीने हस्तांतरण किंवा वापर बदल केला असल्यास, त्या परवानगी आदेशाची प्रत.
- अर्जदाराचे आधार कार्ड / ओळखपत्र.
- अर्जदार यांचे विहीत नमुन्यातील बंधपत्र (स्टॅम्प पेपरची आवश्यकता नाही).
जमीन वर्ग १ करणेकरिता बंधपत्र
समक्ष: मा. तहसीलदार / मा. जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर
बंधपत्र लिहून देणार (अर्जदार): मी/आम्ही,
१) श्री/श्रीमती , वय:
वर्षे,
व्यवसाय:
२) श्री/श्रीमती , वय: वर्षे,
व्यवसाय:
राहणार:
ज्याअर्थी, मौजे , तालुका , जिल्हा कोल्हापूर येथील खालील वर्णनाची जमीन ही शासकीय अभिलेखात 'वर्ग-२' (महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, १९६१ च्या कलम २७ अन्वये मिळालेल्या भोगवटादार वर्ग-२) म्हणून आमच्या नावे नोंदलेली आहे.
जमिनीचा तपशील:
| गट क्रमांक / सर्व्हे क्रमांक: | एकूण क्षेत्रफळ: (हेक्टर/आर मध्ये) |
| चतु:सीमा: पूर्वेस: | पश्चिमेस: | दक्षिणेस: | उत्तरेस: | |
ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाच्या प्रचलित धोरणानुसार आणि महसूल विभागाच्या नियमांनुसार सदर जमीन वर्ग-२ वरून वर्ग-१ (भोगवटादार वर्ग-१) मध्ये रूपांतरित करण्यासाठी आम्ही अर्ज सादर केला आहे.
मी/आम्ही हे बंधपत्र लिहून देतो की, जर शासनाने सदर जमीन वर्ग-१ करण्याबाबतचा आदेश पारित केला, तर आम्ही खालील अटींचे तंतोतंत पालन करण्यास बांधील राहू:
१. सदर जमिनीचे वर्ग-१ मध्ये रुपांतर करण्यासाठी शासनाने ठरवून दिलेली नियमानुकूल नजराण्याची रक्कम आणि इतर सर्व शासकीय शुल्क विहित मुदतीत शासकीय कोषागारात भरण्यास मी/आम्ही बांधील आहोत.
२. सदर जमिनीच्या मालकी हक्काबाबत किंवा वर्ग-२ ची वर्ग-१ करण्याच्या प्रक्रियेबाबत भविष्यात कोणताही वाद, दिवाणी वा फौजदारी खटला निर्माण झाल्यास, त्यास सर्वस्वी मी/आम्ही जबाबदार राहू. यात महसूल विभाग किंवा शासनाचा कोणताही संबंध असणार नाही.
३. या रूपांतरणामुळे जर भविष्यात कोणाचे हितसंबंध बाधित झाले किंवा शासनाचे काही आर्थिक नुकसान झाले, अथवा तिसऱ्या पक्षाने कोणताही दावा केला, तर निर्माण होणारा सर्व खर्च आणि नुकसान भरपाई देण्यास मी/आम्ही वैयक्तिकरित्या व आमच्या वारसा मार्फत बांधील राहू.
४. आम्ही अर्जासोबत सादर केलेली सर्व कागदपत्रे, ७/१२ उतारा, ८-अ चा उतारा आणि दिलेली माहिती पूर्णपणे सत्य व कायदेशीर आहे. ती खोटी किंवा दिशाभूल करणारी आढळल्यास, शासन आमचा वर्ग-१ चा आदेश रद्द करू शकते आणि होणाऱ्या कायदेशीर कारवाईस आम्ही पात्र राहू.
बंधपत्र लिहून देणाऱ्याची स्वाक्षरी/अंगठा:
१) (नाव: )
२) (नाव: )
Evidence Attachments (कागदपत्रे)
👁️ Toggle ViewWorkflow Timeline
👁️ Toggle ViewSelect a document to preview here.
Profile Settings
सुरक्षेसाठी नियमितपणे पासवर्ड बदलणे चांगले आहे.
It is recommended to change your password periodically for security.
Digital Signature (DSC) Settings
No active digital signature certificate registered.
Insert your USB Token and click the button below to register.
| Subject (Officer): | - |
| Serial Number: | - |
| Issuer CA: | - |
| Expiry Date: | - |
Validate that your mToken is communicating and the server correctly verifies your cryptographic signature.
| Date & Time | User | Certificate Serial | Action Taken | Remarks / Event Logs |
|---|
तपासणी पत्रक (Scrutiny Sheet)
| ID | Applicant | Village / Taluka | Circle | Assigned | Action |
|---|
User Management
| Name | Role | Taluka | Circle | Mobile | Actions |
|---|
Office Management
| Taluka | Circle | Village | Actions |
|---|